पुणे : पुण्यामध्ये (Pune News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 13 वर्षीय मुलाचा चौथ्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. टेरेसवर पक्षांना धान्य टाकत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्यातील (Pune News) मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथील एका सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे.
Pune News : डोक्यावरुन चाक गेल्याने पुण्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अभिनव जगदीश कडधाने (वय 13) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो वडगाव मावळ येथील संभाजीनगर भागातील कृष्णा पार्क सोसायटीमध्ये राहायला होता. घटनेबाबत सविस्तर माहिती अशी कि, अभिनव बुधवारी सकाळच्या सुमारास चिमण्या पाहण्यासाठी आणि त्यांना धान्य टाकण्यासाठी घराच्या घौथ्या मजल्यावर म्हणजे गच्चीवर गेला होता. मात्र, पाऊस झाल्याने स्टाईलचा काही भाग निसरडा झाला होता. अभिनव चिमण्या पाहत असताना त्याचा पाय अचानक घसरला आणि त्याचा तोल जाऊन तो चौथ्या मजल्यावरून खाली पडला.यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
Satara News : सिग्नल तोडणे बेतले जीवावर; भीषण अपघाताचा व्हिडीओ आला समोर
अभिनव हा वडगाव मावळ परिसरातील (Pune News) रमेशकुमार सहानी इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत होता. शाळेमध्ये देखील अभिनव मित्रांचा लाडका होता. सर्वांशी मिळून मिसळून राहणे त्याला आवडत होते. मात्र, अचानक घडलेल्या या घटनेने त्याच्या कुटुंबियांना आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.