Rape

Instagram वरची मैत्री पडली महागात! आरोपीने तरुणीसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

686 0

आसाम : वृत्तसंस्था – आसाममध्ये (Assam) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपींकडून चालत्या कारमध्ये 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आसाममधील कोक्राझार जिल्ह्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय घडले नेमके?
रुबेल रहमान, इम्रान हुसेन, अनवर हुसैन आणि मोमिनुर रहमान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण 19-24 वयोगटातील असून मूळचे धुबरी जिल्ह्यातील आहेत. यामधील रुबेल आणि इम्रान हे शालेय विद्यार्थी आहेत, तर मोमिनूर हा चालक म्हणून काम करतो. तर अनवर हा बेरोजगार आहे. पीडित तरुणीची रुबेलशी ओळख होती. ती मुलगी रुबेलच्या काही महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून संपर्कात आली होती.

घटनेच्या दिवशी आरोपी तरुण हा आपल्या मित्रांसह धुबरीहून तिला भेटायला आला आणि त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. ‘मंगळवारी दुपारी गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकाने एक कार अडवली आणि चौकशीदरम्यान संशयास्पद दिसल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. या आरोपींवर पोक्सो कायद्याअंतर्गत (POCSO Act) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!