अखेर यासिन मलिकला जन्मठेप; एनआयए कोर्टाने सुनावली शिक्षा

327 0

 

टेरर फंडिंग प्रकरणी जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रन्टचा विभाजनवादी नेता यासीन मलिक याला एनआयए कोर्टानं शिक्षा सुनावली आहे.

राष्ट्रीय तपास पथकाच्या विशेष कोर्टानं १९ मे रोजी यासिन मलिक याला बेकायदा कारवाया प्रतिबध कायद्यांतर्गत सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवलं होतं. यासिन मलिकला कोर्टानं यापूर्वीच या प्रकरणात दोषी ठरवलं होतं आज सकाळी अंतिम सुनावणी झाली होती यावेळी एनआयएनं मलिकच्या फाशीची मागणी कोर्टाकडं केली होती. या सुनावणीनंतर कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, मलिकला फाशीची शिक्षा होते की जन्मठेप याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.कोर्टानं अखेर फाशीची शिक्षा आज सुनावली आहे.

कोण आहे यासिन मलिक ?

जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा अध्यक्ष

जम्मू काश्मीरमधील फुटीरवादी नेता

पाकिस्तानच्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवाया

1990 मध्ये काश्मीरमधील हिंदू नरसंहारात सहभाग

भारतात टेलर फंडिंग प्रकरणात सहभाग

रुबैया सईद यांच्या अपहरण प्रकरणात सहभागाचा आरोप

 

Share This News
error: Content is protected !!