संतोष बांगर : कुणी म्हणत असेल की, मला जिल्हाप्रमुख पदावरून कमी केलं पण मी हे मान्य करत नाही. बाळासाहेब हयात असताना त्यांनी मला हिंगोली जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी दिली होती. मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे आणि शिवसेनेचा जिल्हाप्रमुखच राहणार…
………………………………..
12 खासदार, 50 जिल्हाप्रमुख शिंदे गटाच्या संपर्कात !
शिवसेनेचे 12 खासदार आणि 50 जिल्हाप्रमुख शिंदे गटात लवकरच सामील होतील. तालुकाप्रमुख, संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख, शाखाप्रमुख हे देखील एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. आमच्यावर बंडखोरीचा होत असलेला आरोप चुकीचा आहे. कारण आम्ही शिवसेनेच्याच मुख्यमंत्र्याला मतदान केलंय.
…………………………………
उद्धव ठाकरेंना चांडाळ चौकडीनं घेरलंय..!
महाविकास आघाडी ही अभद्र युती होती. उद्धव ठाकरे यांच्या बाजूला जी चांडाळ चौकडी जमली आहे ती त्यांच्यापासून खरी माहिती लपवून त्यांची दिशाभूल करत आहेत.
………………………
आधी रडले नंतर शिंदे गटात शिरले..!
पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल शिवसेनेनं आमदार संतोष बांगर यांची हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली आणि बांगर यांना संताप अनावर झाला. एकनाथ शिंदेंनी काही आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केल्यानंतर सर्व आमदारांनी परत येण्याचं आवाहन याच संतोष बांगर यांनी केलं होतं. त्यावेळी ते ढसाढसा रडले होते. मात्र त्यानंतर बहुमत चाचणीवेळी विरोधात मतदान करून मीही शिंदे गटासोबत असल्याचं त्यांनी दाखवून दिलं होतं. बांगर यांनी खासदार, जिल्हाप्रमुखांबाबत केलेला गौप्यस्फोट पाहाता शिवसेनेला आणखी काय काय पाहावं लागणार, याची कल्पना न केलेलीच बरी !
– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक
TOP NEWS मराठी