NCP

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण: पुढील सुनावणी 3 सप्टेंबरला होणार; आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?

1647 0

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकाला विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडले असून आता पुढील सुनावणी 3 सप्टेंबर रोजी होणार आहे.

आजच्या सुनावणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली असून आमदारा पात्रता प्रकरणाची सुनावणी हायकोर्टात व्हावी असे मागणी अजित पवार गटाची होती. मात्र ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयातच होणार असून शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 3 सप्टेंबरला स्वतंत्र सुनावणी देखील होणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!