राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानसभेचा पहिला उमेदवार जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणाला मिळाली उमेदवारी

498 0

नाशिक: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.

दिंडोरी या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या उमेदवाराची घोषणा केली आहे.

 

दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आणि दिंडोरी विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले आहे.

मागील काही दिवसापासून नरहरी झिरवाळ नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या याच पार्श्वभूमीवर ही उमेदवारी जाहीर झाल्याचं राजकीय वर्तुळात बोलले जात आहे दिंडोरी मतदार संघात नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असून जर गोकुळ झिरवाळ यांना उमेदवारी मिळाली तर दिंडोरी मतदार संघात पिता-पुत्रांची लढत पाहायला मिळू शकते

Share This News
error: Content is protected !!