पुणे: पुण्यात वाहन तोडफोडीच्या घटना काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीत. आंबेगाव पठार येथील स्वामी नगरमधील महारुद्र जिमच्या परिसरात 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं रस्त्यावरील 9 वाहनांची तोडफोड केली. शनिवारी रात्रीच्या सुमारास घडलेला हा सारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.
गेली काही दिवसांपासून पुणे शहरासह उपनगरांमध्ये वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच आहे. यापूर्वी सहकारनगर, पद्मावती, पर्वती, जनता वसाहत परिसरात अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी रात्री आंबेगाव पठार येथील महारुद्र जिमच्या परिसरात 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं रस्त्यावरील 9 वाहनांची तोडफोड केली. सिमेंट बॉक्सचा वापर करून दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी गणेश दिलीप रांजणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात 10 ते 15 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.