राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली असून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहे.
एक जुलै रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर अंडरग्राउंड पार्किंग वरून जो वाद निर्माण झाला होता त्यातून आंबेडकरी अनुयायांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले ते गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर हे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
या भेटीमध्ये प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोणते राजकीय चर्चा होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे..