राणेंना भिडणाऱ्या वैभव नाईकांची ठाकरे गटानं सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून गच्छंती

518 0

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत समजले जाणारे आमदार वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून गच्छंती करण्यात आली आहे.

खासदार विनायक राऊत यांनी वैभव नाईक यांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केली आहे. वैभव नाईक यांच्या उचलबांगडीनंतर सिंधुदुर्गात तीन जिल्हाप्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये संदेश पारकर, सतीश सावंत आणि संजय पडते यांचा समावेश आहे. आमदार वैभव नाईक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा असल्याने जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतु, आपल्याकडे पक्षवाढीचं काम दिल्यामुळे जिल्हाप्रमुख पद दुसऱ्या व्यक्तीकडे देण्यात आल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!