सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभा संपन्न

424 0

 

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दिनांक ११ व १२ मार्च २०२३ रोजी विद्यापीठाची अधिसभा संपन्न झाली. या अधिसभेत विद्यार्थी आणि शैक्षणिक विषयावर चर्चा करण्यात आली. या अधिसभेचे अध्यक्ष म्हणून कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी काम पाहिले.

तर प्र.कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. या अधिसभेचे सचिव म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी काम पाहिले. यावेळी विद्यापीठातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

या दोन दिवसीय सभेत अधिसभा सदस्यांनी अनेक प्रस्ताव मांडले, तसेच प्रश्नोत्तराच्या तासात विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक निर्णय घेण्यात आले.

दरम्यान या अधिसभेत अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक तसेच प्रशासकीय कामगिरीचा अहवाल सादर केला.

दरम्यान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अमृत सरोवर तयार करण्यात येणार असल्याचे डॉ.सोनवणे यांनी सांगत त्यासाठी पन्नास लाखांची तरतूद केली असल्याचे जाहीर केले. तसेच भारतीय विज्ञान परिषदेत विद्यार्थी सहभाग, भाषाशास्त्र व अनुवाद अभ्यास केंद्र, मिलेट अभ्यास केंद्र, पुस्तक अनुवाद, विद्यापीठ संगीत भवन भौतिशास्त्र विभागाचा विस्तार आदींसाठी आर्थिक तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे डॉ.सोनवणे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.

ज्या विद्यार्थ्यांना अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो, तसेच ज्यांच्या पालकांना दुर्धर आजाराने ग्रासाले आहे अशा विद्यार्थ्यांना छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या नावे शिष्यवृत्ती सुरू करण्याचा प्रस्ताव डॉ.अपूर्व हिरे आणि अशोक सावंत यांनी अधिसभेसमोर ठेवला, त्याला प्रसेनजीत फडणवीस यांनी अनुमोदन दिले. यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याचेही अधिसभा अध्यक्षांनी जाहीर केले.

अधिसभा सदस्यांचे आभार डॉ.प्रफुल्ल पवार यांनी मानले.

Share This News

Related Post

Breaking News ! चीनमध्ये बोइंग 737 विमान डोंगरात कोसळले, 132 प्रवासी होते विमानात

Posted by - March 21, 2022 0
चीनचे बोईंग 737 विमान ग्वांगशी प्रांतात कोसळल्याचे वृत्त आहे. अपघाताच्या वेळी विमानात 133 जण होते असे सांगण्यात येत आहे. चीनच्या…

Breaking !! धक्कादायक ! पुण्यात 12 वर्षांच्या मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार, आरोपी फरार

Posted by - April 9, 2022 0
पुणे- पुण्यात 12 वर्षांच्या मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार करण्यात आल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा…

अभिमानास्पद : भारत-पाकिस्तान सीमेवर उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

Posted by - February 15, 2023 0
काश्मीर : छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्य त्यांच्या पुतळ्याकडे पाहून दररोज मिळावेत. यासाठीच आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने छत्रपती…
Congress

Congress Loksabha : काँग्रेसची लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Posted by - March 8, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. आता काँग्रेसने आपली यादी जाहीर केली…

अभाविपचं  S S Professional institute येथे टाळा ठोको आंदोलन

Posted by - March 5, 2022 0
एस एस प्रोफेशनल इन्स्टिट्यूट वर्षभरापासून विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक करत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे संपूर्ण शुल्क घेऊन सुद्धा दुसऱ्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *