उद्धव ठाकरेंचा राजीनामा; संजय राऊतांनी मानले शरद पवारांचे आभार

281 0

मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले असून राऊत हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात मी शरद पवार यांचे आभार मानतो. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलास सांभाळून घेतले. मार्गदर्शन केलं.स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धवजींच्या मागे ठामपणे उभे राहिले. काँग्रेस नेत्यांनी देखील सदैव समन्वयाची भूमिका घेतली. सत्ता येते सत्ता जाते. अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही! असे ट्वीट राऊत यांनी केले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!