IAS Tukaram Mundhe

तुकाराम मुंढेची महिन्याभरातच बदली; ‘या’ विभागाची देण्यात आली जबाबदारी

759 0

मुंबई : मागच्या महिन्यात आयएएस तुकाराम मुंढे (IAS Tukaram Mundhe) यांची कृषी आणि पशुसंवर्धन विभागात अतिरिक्त सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची आतापर्यंतची कारकीर्द पाहिली असता गेल्या 16 वर्षांत त्यांच्या 21 बदल्या झाल्या आहेत.

राज्य सरकारकडून शुक्रवारी (ता. 2 जून) वीस भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या करण्यात आल्या. यात तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे. त्यांची आता मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!