Ruchesh Jaywanshi

साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली

847 0

सातारा : साताऱ्याचे (Satara) जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (Ruchesh Jayavanshi) यांची अचानक राज्य सरकारने बदली (Transfer) केली आहे. महाबळेश्वर पाचगणी कास मॅप्रो गार्डनबाबत घेतलेली कडक भूमिका. तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांची नाराजीचे कारण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बुधवारी जिल्हाधिकारी यांनी महाबळेश्वर येथील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली होती आणि याच दिवशी त्यांच्या बदलीचे आदेश आले आहेत. रुचेश जयवंशी यांच्या जागी सांगली (Sangli) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी (Jitendra Dudy) यांची साताऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून वर्णी लागली आहे.

Share This News
error: Content is protected !!