Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : ‘उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर मोठं कांड होणार आहे’; अज्ञात व्यक्तीने केला नियंत्रण कक्षाला फोन

429 0

मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर मोठं कांड करणार आहेत’ असा धमकीचा फोन महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या फोननंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. तसेच हा फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

काय आहे संपूर्ण प्रकार?
एका अज्ञात व्यक्तीनं महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर मोठं कांड करणार आहेत असं संभाषण आपण ऐकल्याचा दावा या व्यक्तीनं केला. मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या चार ते पाच व्यक्तींचं संभाषण सुरू होतं, हे तरुण उर्दूतून संभाषण करत होते. ते तरुण मोहम्मद अली रोड येथे रुम रेंटवर घेणार आहेत.

ते उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर मोठं कांड करण्यासंदर्भात बोलत होते, अशी माहिती अज्ञात व्यक्तीनं फोन करून महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला दिली आहे. दरम्यान या फोननंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून त्यांनी हा फोन नेमका कोणी केला होता त्या व्यक्तीच्या तपासाला सुरुवात केली आहे. या फोनमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी 11 जणांना घेतलं ताब्यात

Rohit Sharma : रोहित शर्मा मैदानात उतरताच करणार ‘हा’ मोठा विश्वविक्रम

Milind Deora : मिलिंद देवरांसोबत ‘या’ पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

Viral Video : धावत्या दुचाकीवर एकमेकांना मिठी मारत अन् अंगावर ब्लँकेट घेत जोडप्याने केले नको ते चाळे

Pune News : खुशखबर ! अष्टविनायक दर्शनासाठी आता एसटीची विशेष सेवा

Milind Deora : ‘देवरा यांच्या राजीनाम्याची वेळ PM मोदींनी ठरवली’; ‘या’ काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

Sharad Mohol : मोहोळचा गेम झालाय, मास्टरमाईंडला सांगा; हत्येनंतर आरोपींनी ‘या’ सरकारी कर्मचाऱ्याला केला कॉल

Gold Rate Today : सोनं-चांदी महागली!

Milind Deora : काँग्रेसला मोठा धक्का ! माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला रामराम

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!