देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच सरकार येण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाल्यानंतर आता नरेंद्र मोदी हे आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत नरेंद्र मोदी यांच्या समवेत 50 ते 55 मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता असून या मंत्र्यांमध्ये महाराष्ट्रातून महत्त्वाच्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत पंतप्रधान कार्यालयातून महाराष्ट्रातील खासदारांपैकी नितीन गडकरी पियुष गोयल रक्षा खडसे रामदास आठवले मुरलीधर मोहोळ यांना फोन करण्यात आला असून या खासदारांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.
शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून प्रफुल पटेल यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता असली तरी प्रफुल पटेल यांना अद्याप पर्यंत कोणताही फोन आला नसल्यानं प्रफुल पटेल यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार का याबाबत साशंकता आहे.