ठाण्यात निर्माणाधीन इमारतीची लिफ्ट कोसळली; 6 कामगारांचा जागीच मृत्यू

493 0

ठाण्यातील बाळकुम परिसरातील रुणवाल आयरीन या निर्माणधीन इमारतीच्या 40मजल्यावरून लिफ्ट कोसळून सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळकुम येथील रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीचं बांधकाम सुरु आहे. या इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होतं. वॉटरप्रूफिंगचे काम संपलं. त्यानंतर या इमारतीच्या लिफ्टने आठ मजूर खाली येत होते. त्यावेळी लिफ्टचा दोर तुटला. त्यानंतर हा मोठा अपघात घडला, असं सांगण्यात येत आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!