रायगड : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर किनाऱ्यावरून एक खळबळजनक माहिती समोर येते आहे . हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद पद्धतीने बोट आढळून आली आहे .
सुरुवातीला ही बोट स्थानिक मासेमाऱ्यांची असल्याचे वाटले परंतु, या बोटीमध्ये शस्त्रास्त्रसाठा आढळून आला आहे . त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे .
जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे . दरम्यान या बोटीमध्ये AK 47 बंदूक सापडून आली असल्याचे समजते आहे . परंतु याची पुष्टी अद्याप झालेली नाही .
घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर गुप्तता बाळगण्यात येते आहे . त्यासह मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
बातमी उपडेट करत आहोत , वाचत राहा …