SOMNATH SURYAWANSHI CASE SUPRIME COURT: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यु प्रकरणात राज्य सरकारला झटका; सुप्रीम कोर्टातील सुनावणीत काय झालं?

392 0

SOMNATH SURYAWANSHI CASE SUPRIME COURT: परभणी मध्ये नारायण कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्युप्रकरणात एक मोठे अपडेट समोर आली..

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलिस जबाबदार असल्याचा उच्च न्यायालयाचा, निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला.

10 डिसेंबर 2024 रोजी परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती.

या घटनेनंतर आंबेडकरी संघटनांनी परभणीत तीव्र आंदोलन करत बंद पुकारला होता.

सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांना आज मोठा दिलासा मिळाला

या बंदला अचानक हिंसक वळण लागले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.

अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तसेच लाठीचार्जही करण्यात आला.

याचवेळी मूळचा लातूरचा आणि पुण्यात कायद्याचे शिक्षण घेणारा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

मात्र अवघ्या दोनच दिवसांत पोलीस कोठडीत सोमनाथचा मृत्यू झाला होता.

सोमनाथच्या आईने या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

SOMNATH SURYAVANSHI CASE: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या याचिकेवर सोमनाथची बाजू मांडली होती.

उच्च न्यायालयाने पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.. या देशाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली..

महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे.

#SomnathGaikwad : वनराजच्या हत्येचा मास्टरमाइंड सोमनाथ गायकवाड आहे तरी कोण ?

याप्रकरणी दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
अशी माहिती ट्विटच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा खटला लढणारे वकील प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

या निर्णयामुळे सोमनाथच्या कुटुंबियांच्या आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या लढ्याला यश मिळालं.

Share This News
error: Content is protected !!