Breaking News
Rahul Gandhi

Rahul Gandhi : राहुल गांधींना मोठा धक्का! गुजरात हायकोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली

454 0

अहमदाबाद : एकीकडे भाजपविरोधात महागटबंधनासाठी तयारी सुरू असताना काँगेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. गुजरात हायकोर्टाने राहुल गांधींची (Rahul Gandhi) याचिका फेटाळली आहे. राहुल गांधी यांनी गुजरात हायकोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने ती फेटाळत त्यांची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे.

Monsoon Session : 20 जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात; ‘या’ मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मोदी यांच्या आडनावाचा वापर करुन बदनामी केल्या प्रकरणी राहुल गांधी यांना गुजरात हायकोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र त्यावर राहुल गांधी यांच्या वकिलांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिका आता कोर्टाने फेटाळली आहे. या मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांनी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करत हायकोर्टात अपील केलं होतं त्यावर हा महत्वाचा निर्णय देण्यात आला आहे.

Pankaja Munde : वेड्या बहिणीची वेडी ही माया ! भावाला मंत्रिपद मिळाल्याच्या आनंदात बहिणीने केले औक्षण

तर दुसरी महत्वाची गोष्ट राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाली तर नियमानुसार त्यांना पुढची 6 वर्ष निवडणूक लढवता येणार नाही. त्यांचं पंतप्रधानपदी विराजमान होण्याचं स्वप्न अपूर्ण राहील. त्यामुळे आता राहुल गांधी आपली खासदारकी रद्द होऊ नये यासाठी आता सुप्रीम कोर्टात जाणार आहे.

Share This News
error: Content is protected !!