traffic jam

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

768 0

पुणे : पुणे – मुंबई महामार्गावर (Mumbai Expressway) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्थाप सहन करावा लागत आहे. मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची संख्या अचानकपणे वाढल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. सुमारे 8 किलोमीटर पर्यंत या वाहनांच्या रांगा लागल्याचे समजत आहे. ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना बोरघाटात (Borghat) तैनात करण्यात आले आहे.

पुण्याकडे (Pune) येणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांकडून ब्लॉक घेतले जात आहेत. दहा-दहा मिनिटांसाठी मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवून, त्या मार्गावरून ही पुण्याकडे येणारी वाहतूक सोडली जात आहे. यामुळे हि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहेत.

Share This News
error: Content is protected !!