वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरवर केंद्र सरकारनं मोठी कारवाई केली आहे. त्यांना सरकारी सेवेतून बरखास्त करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
यापूर्वी संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीनं पूजा खेडकरची उमेदवारी रद्द करत तिच्या विरोधात फसवणुकीचा खटला दाखल केला होता.
पूजा खेडकर यांच्यावर एकामागेएक असे अनेक आरोप होत आहेत. यूपीएससी परीक्षेत निवड व्हावी यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. इतकेच नाही तर त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सुद्धा खोटे आहे.
दोनच दिवसांपूर्वी न्यायालयाने पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण दिले होते. 26 सप्टेंबरला पूजाच्या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होणार होती.