कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीचा भाजप प्रवेश

1866 0

पुणे: पुण्यात भाजपमध्ये कुख्यात गुंडाच्या पत्नीचा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला. यामुळे पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

यावेळी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते. शरद मोहोळ हा कुख्यात गुंड आहे. त्याच्या विरोधात पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागात अनेक गुन्हे दाखल आहेत.

पुणे पोलिसांनी शरद मोहोळविरोधात मोक्का अंतर्गत कारवाईसुद्धा केली होती. शरद मोहोळ येरवडा कारागृहात असताना त्यांनी दहशतवादी कातील सिद्दिकी याचा खून केला होता. अशा कुख्यात गुंडाच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

यापूर्वीच प्रवेश होणार होता

दोन वर्षापूर्वी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात स्वाती मोहोळ यांनी हजेरी लावली होती.त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या कॉफी टेबल बुकचे पुण्यात प्रकाशन झाले होते.त्यावेळी शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहळ यांनी चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला होते. यावेळी हजारो कार्यकर्त्यांना शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आणले होते. मात्र त्यावेळी स्वाती मोहोळ यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Share This News
error: Content is protected !!