Fire

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर केमिकल टँकरला भीषण आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू

734 0

पुणे : पुणे-मुंबई महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) खंडाळा घाटातील (Khandala Ghat) कुणे पुलावर (Kune Bridge) भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये केमिकलची वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याने हा अपघात झाला आहे. या टँकरने जागीच पेट (Fire) घेतल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यावेळी रस्त्यावर केमिकल सांडल्याने एक दुचाकीस्वार यावरून घसरला. यामध्ये दुचाकीवरील 12 वर्षांचा मुलगा होरपळून ठार झाला तर त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुर्घटनेत टँकर चालकही गंभीर जखमी झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातामध्ये आतापर्यंंत एकूण 4 ठार आणि 3गंभीर जखमी झाल्याचे समजत आहे. या ठिकाणी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून सध्या वाहतूक लोणावळा शहरातून वळवली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide