MRF Share

MRF च्या शेअरची किंमत 1 लाख रुपयांच्या पुढे; कंपनीने रचला विक्रम

356 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – MRF Limited या टायर आणि रबर उत्पादन निर्मिती कंपनीच्या शेअरच्या किमती आज म्हणजेच 13 जून रोजी 1 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. यासह, MRF च्या शेअरची किंमत प्रति शेअर 1 लाख रुपये झाली आहे. MRF ही पहिली भारतीय कंपनी ठरली जिच्या शेअरच्या किंमतीने 1 लाखांचा टप्पा पार केला आहे.

गेल्या एका वर्षात, MRF शेअर्स (MRF शेअर किंमत) 46 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत आणि मंगळवारी ते आयुष्यभरातील उच्च पातळीवर पोहोचले आहेत. तत्पूर्वी, तिमाही आणि वार्षिक आर्थिक निकालांनंतर या शेअरने 8 मे रोजी 99,933 रुपये प्रति शेअर हा उच्चांक गाठला होता.

जानेवारी 2021 मध्ये पहिल्यांदाच MRF स्टॉक 90,000 च्या वर बंद झाला आणि जवळपास अडीच वर्षांच्या अंतरानंतर त्याने आज विक्रमी रु. 1 लाखाचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे, MRF ने लाभांश देत असतानाही कधीही बोनस शेअर्स जारी केले नाहीत किंवा शेअरहोल्डिंग बेस वाढवण्यासाठी स्टॉक स्प्लिटदेखील केले नाहीत.

Share This News
error: Content is protected !!