Aslam Shaikh

Aslam Shaikh : काँग्रेस नेते अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी

2054 0

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे नेते तथा मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अस्लम शेख (Aslam Shaikh) यांना कॅनेडियन गँगस्टरकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

गँगस्टर गोल्डी ब्रार बोलत असल्याचं सांगून एका कॉलरने अस्लम शेख यांना धमकी दिली. त्यानंतर त्यांनी रविवारी बांगुर नगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. ब्रार ज्याला सतिंदरजीत सिंह या नावाने ओळखलं जातं, तो एक फरार कॅनेडियन गँगस्टर आहे.

गोल्डी ब्रार हा खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या जवळचा असल्याचे समजत आहे. विशेष म्हणजे ब्रार याने याआधी बॉलिवूड स्टार सलमान खानलादेखील धमकी दिली होती. अस्लम शेख यांना धमकी मिळाल्यानंतर त्यांचे खासगी सचिव आणि वकील विक्रम कपूर यांनी एफआयआर दाखल केला आहे. बांगुर नगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.

Share This News
error: Content is protected !!