Mandhardevi Temple

Mandhardevi Temple : मांढरदेवी मंदिर आज पासून 8 दिवस राहणार बंद

1797 0

सातारा : साताऱ्यातून एक महत्त्वाची बातमी आहे. वाई तालुक्यातील मांढरदेवी मंदिर (Mandhardevi Temple) आज पासून 28 सप्टेंबर पर्यंत भाविकांसाठी बंद राहणार आहे. मांढरदेव येथील काळुबाई मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीचे काम आज गुरुवार( दि 21)पासून सुरु करण्यात आल्याने गाभाऱ्यात जाऊन देवीचे मुख दर्शन घेता येणार नाही, असे समितीकडून कळवण्यात आले आहे. यामुळे हे मंदिर 8 दिवस बंद राहणार आहे.

या कालावधीमध्ये ज्यांना बाहेरुन दर्शन घ्यायचे आहे ते मात्र या गडावर येऊ शकतात. मात्र गाभाऱ्यात जाऊन देवीचे मुख दर्शन घेता येणार नाही असे समितीकडून सांगण्यात आले आहे. या काळात येणाऱ्या भाविकांची गैरसोय नको, म्हणून प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी येथील सभामंडपात उत्सवमूर्ती ठेवण्यात येणार आहे.

गाभाऱ्यातील दुरुस्तीच्या कामासाठी मंदिराचा संपूर्ण गाभारा बंद ठेवला जाणार असल्याचे मंदिर समितीने कळवले आहे.दि 21ते 28 सप्टेंबर या कालावधीत हे मंदिर बंद ठेवले जाणार आहे.

Share This News
error: Content is protected !!