केंद्र सरकारच्या वतीनं पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्राला मिळाले 12 पद्म पुरस्कार

514 0

देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखा/कार्यक्रमांमध्ये हे पुरस्कार दिले जातात.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातून प्रसिध्द तबला वादक, झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रातून पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांमध्ये साहित्य व शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदानासाठी दोन मान्यवरांची निवड झाली आहे, यात साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ प्रभाकर मांडे व रमेश पतंगे यांचा समावेश आहे. या वर्षी एकूण 106 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये 6 पद्म विभूषण, 9 पद्म भूषण आणि 91 पद्मश्री पुरस्कार सामील आहेत. यासह 19 महिला तर 02 हे परदेशी नागरिक आहेत. 7 मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.

Share This News

Related Post

खासदार संजय राऊतांना 15 दिवसांचा तुरुंगवास आणि 25 हजारांचा दंड; नेमकं प्रकरण काय?

Posted by - September 26, 2024 0
मुंबई: राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांना…
Hardeepsingh Nijjar

Hardeep Singh Nijjar : कॅनडात खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरची गोळ्या झाडून हत्या

Posted by - June 19, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॅनडात खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची…
Jalna Crime

Jalna Crime : कारमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या ‘त्या’ महिलेचा पतीच ठरला मारेकरी; असा उघडकीस आला बनाव

Posted by - June 29, 2023 0
जालना : काही दिवसांपूर्वी जालनामध्ये (Jalna Crime) एक धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये कारच्या एका भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू…

रुपाली पाटील-ठोंबरे यांची फेसबुकवर बदनामी; मनसेच्या 16 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

Posted by - April 29, 2022 0
पुणे- फेसबुकवर ‘एक करोड ताईवर नाराज’ असणाऱ्यांचा ग्रुप तयार करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *