Sharad Pawar Shirur

Maharashtra Politics : आम्ही शरद पवरांसोबत राष्ट्रवादीच्या ‘या’ 5 आमदारांनी जाहीर केली आपली भूमिका

742 0

पालघर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार यांनी यावेळी पक्षाच्या सर्व आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. मात्र, काही आमदारांनी शरद पवार जो निर्णय घेतील त्यांच्यासोबत राहणार असल्याची भूमिका मांडली.

पालघरमधील विक्रमगडचे आमदार सुनिल भुसारा यांनी जाहीर केली भूमिका
मी नेहमीच अजित पवार यांना यांनी आज त्यांनी घेतलेल्या भूमिकेपासून परावृत्त करत होतो, असं सुनिल भुसारा म्हणाले. मी शरद पवार यांचा सैनिक असून जिल्ह्यातील जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी देखील कुठेही मनात किंतु परंतु न आणता शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहावे,अशी भूमिका विक्रमगड विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल भुसारा यांनी आपण शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले आहे.

Ajit Pawar : अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे ‘हे’ नेते फुटले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ 5 आमदारांनी जाहीर केली भूमिका
जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील, सुनिल भुसारा आणि अनिल देशमुख यांनी शरद पवार यांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

विरोधी पक्षनेतेपदी आणि मुख्य प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती
आजच्या राजकीय भूकंपानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली आणि पक्षाची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेतेपदी आणि मुख्य प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!