Exam

SSC HSC Exam Time Table : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! दहावी, बारावीच्या अंतिम परीक्षेचं वेळापत्र जाहीर

1149 0

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाने पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक (SSC HSC Exam Time Table) जाहीर केलं आहे. बारावी बोर्ड परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 पर्यंत होणार आहे. तर दहावी बोर्ड परीक्षा ही 1 मार्च ते 26 मार्च 2024 दरम्यान घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने परिपत्रकाच्या माध्यमातून ही माहिती प्रसिद्ध करणायात आली आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी असून, परीक्षेपूर्वी सर्व माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. मंडळाकडून देण्यात आलेल्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी अशी सूचना मंडळाकडून देण्यात आली आहे.

अधिकृत माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
SB-Exam6-4852-20231101

तसेच प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!