LPG Gas

गॅस सिलिंडरच्या दरात बदल! ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त झाला सिलेंडर

825 0

मुंबई : सगळीकडे महागाई (Inflation) वाढल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे बजेट (Budget) ढासळत आहे. त्यातच आता सर्वसामान्य लोकांना थोडासा दिलासा मिळणारी बातमी समोर आली आहे. दर महिन्याच्या सुरुवातीला LPG गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) दरात बदल होत असतात. आजपासून नवे दर लागू होणार आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 83 रूपये 50 पैशांची कपात झाली असून घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नाही. यापूर्वी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅसच्या किमतींत 172 रुपयांनी कपात करण्यात आली होती. नवी दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत 83.5 रुपयांनी कमी झाली असून ती आता 1 हजार 773 रुपयांवर पोहोचली आहे. तर घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1 हजार 103 रुपये आहे तेवढाच आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये आहे. कोलकात्यात 1129 रुपये, मुंबईत 1102.5 रुपये, चेन्नईमध्ये 1118.5 रुपये, भोपाळमध्ये 1108.5 रुपये, जयपूरमध्ये 1106.5 रुपये, इंदूरमध्ये 1131 रुपये, अहमदाबादमध्ये 1110 रुपये आणि लखनऊमध्ये 1140.5 रुपये आहे.

Share This News
error: Content is protected !!