Lalit Patil

Lalit Patil : ललित पाटीलला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी

1015 0

मुंबई : पुण्यातील ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील (Lalit Patil) हा आरोपी 2 ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. त्या घटनेला 15 दिवसांचा कालावधी होऊन देखील आरोपी ललित पाटीलचा शोध लागत नव्हता. आज अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले. मुंबई पोलिसांनी त्याला तामिळनाडूील चेन्नई येथून अटक केली आहे. त्याला आज अंधेरी कोर्टात हजर केले असता त्याला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यादरम्यान ललित पाटीलने मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवून नेलं..कोणाचा हात आहे सर्व सांगेन असा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्याच्या चौकशीतुन अजून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!