पिंपरी पालिकेतील भाजपचे नगरसेवक केशव घोळवे यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक (व्हिडिओ)

252 0

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून गाळे मिळवून देण्याच्या बहाण्याने 55 हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे नगरसेवक केशव घोळवे यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. घोळवे यांच्या अटकेने पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी गुड्डू उर्फ प्रमोद यादव, घनशाम यादव, मलका यादव, केशव घोळवे, हसरत अली शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद तय्यब अली शेख (वय 45, रा. पिंपरी. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि इतर व्यापारी नेपाळी मार्केट येथे कपड्याचा व्यापार करतात. त्यांची जागा मेट्रोच्या प्रकल्पात जाणार आहे. तिला पर्याय म्हणून शासनाकडून फिर्यादी आणि इतर व्यापा-यांना 100 गाळे कायदेशीर मिळणार आहेत. असे असताना आरोपींनी आपसात संगनमत करून सन 2019 ते आजपर्यंत फिर्यादी व इतर व्यापा-यांना महापालिकेकडून गाळे मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यापोटी भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संस्थेमध्ये दरवर्षी बाराशे रुपयांची पावती करायला भाग पाडले. आजपर्यंत एकूण 55 हजार रुपयांची खंडणी घेऊन फिर्यादी आणि इतर व्यापा-यांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यानंतर देखील एक लाख रुपयांची मागणी केली. त्यासाठी फिर्यादी यांनी विरोध केला असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे देखील फिर्यादीमध्ये म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी व्ही डोंब पुढील तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!