Breaking दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला

181 0

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. काही समाजकंटकांनी सीएम केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आहे. असे ट्विट उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, केजरीवाल यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा भिंती तोडल्या आहेत. याशिवाय गेटवरील बूम बॅरिअर्सही तुटले आहेत. भाजपच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केली, असा आरोप मनीष सिसोदिया यांनी केला आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना थांबवण्याऐवजी त्यांना दारात आणले, असेही ते म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!