श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 5 परदेशी दहशतवाद्यांना कंठस्नानी पाठवण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. यानंतर एलओसीजवळ जवानांकडून सर्च ऑपरेशन जारी करण्यात आलं आहे. कुपवाडा इथे सुरक्षा दल आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पाच विदेशी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्या परिसरात अजूनही शोधमोहीम सुरु आहे.
काश्मीर एडीजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यांनी सांगितले की, परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून सध्या त्या ठिकाणी शोधमोहीम सुरु आहे. खोऱ्यात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर, जवान अलर्ट झाले. दहशतवाद्यांचा एकही मनसुबा यशस्वी होऊ न देण्यासाठी मोठी कारवाई केली जात आहे.
Kupwara encounter | Five foreign terrorists killed in the encounter, search operation underway: ADGP Kashmir, Vijay Kumar https://t.co/MvNPn65jBQ
— ANI (@ANI) June 16, 2023
ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचं पाकिस्तानशी कनेक्शन असल्याचं सांगण्यात आलं आहे. या कारवाईमध्ये एकूण 5 दहशतवादी ठार झाले आहेत.