मंत्रालयाच्या संरक्षक भिंतीवरून चक्क आमदारांनी मारल्या उड्या; नेमकं कारण काय?

162 0

मंत्रालयाच्या इमारतीमध्ये मध्यभागी लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीवर नरहरी झिरवळांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत असलेल्या आदिवासी आमदारांनी उड्या मारल्यानंतर त्यांना या संरक्षण जाळीवरुन बाहेर काढण्यात आलं आहे. झिरवळांबरोबर राजेश पाटील आणि इतर दोन आमदारांनाही त्यांच्याबरोबर उडी मारली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीने या आमदारांची भेट घेऊन त्यांच्याशी त्यांच्या मागण्यांबद्दल चर्चा केली. सरकार आमच्या मागण्या ऐकण्यास तयार नसेल तर आमचा प्लॅन बी तयार असल्याचं आंदोलक आमदारांनी सांगितलं आहे.

नरहरी झिरवाळांनी मंत्रालयाच्या इमारतीवरुन मारली उडी
नरहरी झिरवाळांनी मंत्रालयाच्या इमारतीवरुन उडी मारली. त्यांनी मंत्रालयाच्या मध्यभागी लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीवर झिरवळांनी उडी मारली. आज सकाळपासून आदिवासी आमदारांचं मंत्रालयामध्ये आंदोलन सुरु आहे. सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही या आमदारांनी आडवलं होतं. आदिवासी आरक्षणाअंतर्गत धनगरांना आरक्षण देऊ नये अशी या आंदोलनकर्त्या आमदारांची मागणी आहे.

Share This News
error: Content is protected !!