पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : 1 ऑक्टोबरला पुण्यातील CNG पंप राहणार बंद

512 0

पुणे : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे . पुण्यातील जवळपास 60 हून अधिक सीएनजी CNG पंप शनिवारी दि. 1 ऑक्टोबरला बंद राहणार आहेत . यामुळे अनेक सीएनजी वापर करते रिक्षाचालक आणि कॅब चालकांना याचा फटका बसू शकतो.

दरम्यान पेट्रोल डीलर असोसिएशनने एक ऑक्टोबर रोजी नो सेल बद्दल टोरेंट आणि ओएमसीला माहिती दिली होती. परंतु त्यावर कोणतेही उत्तर मिळाले नाही. म्हणून पुण्यातील सर्व सीएनजी पंप एक दिवसासाठी बंद राहणार असल्याची माहिती मिळते आहे.

डीलर्स ना त्यांच्या ट्रेंड मार्जिन मधील पुनरावृत्तीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. टोरेंट गॅस कडून हक्क आणि वाजवी मार्जिन या मागणीसाठी पेट्रोल डीलर असोसिएशन हा बंद पुकारला आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबर रोजी पुण्यातील 60 सीएनजी पंप बंद राहणार आहेत.

 

Share This News
error: Content is protected !!