मी पहिल्यापासूनच सांगत होतो पण…; अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया

875 0

दिल्लीतील कथित मध्य घोटाळ्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला

यावेळी भर सभेत कार्यकर्त्यांसमोर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. पुढील दोन दिवसांमध्ये आपण दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीबरोबर दिल्ली विधानसभेच्याही निवडणुका  घ्याव्यात अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली.

अरविंद केजरीवाल यांच्या राजीनामाच्या घोषणेवरून आता अरविंद केजरीवालांचे एकेकाळचे गुरु आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अरविंद केजरीवाल यांना मी पहिल्या दिवसापासून लोकांची सेवा करा खूप पुढे जाल असा सल्ला देत होतो मात्र त्यांनी राजकारणात जायचा निर्णय घेतला असं अण्णा हजारे म्हटले आहेत.

Share This News
error: Content is protected !!