पती तुरुंगात, पत्नीचे अनैतिक संबंध अन् प्रियकरानेच तिचं शीर धडा वेगळं केलं; धक्कादायक कारण समोर

476 0

अनैतिक संबंधातून होणाऱ्या हत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशीच एक हत्या अहिल्यानगरमध्ये देखील घडलीये. ज्यामध्ये प्रियकराने आपल्याच प्रेयसीचं शीर धडा वेगळं केलं. आणि स्वतःच पोलिसांना फोन करून आपण आपल्या प्रेयसीचा अमानुष खून केलाय असंही सांगितलं. प्रेमावरचा विश्वास उडवणारी ही धक्कादायक घटना

सोनाली राजू जाधव असं या 28 वर्षीय मयत महिलेचं नाव आहे. ती मूळची पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या पोखरी येथे राहणारी… तिचे तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या असलेल्या सखाराम धोंडिबा वालकोळी या व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. सखारामचं वय 53 वर्ष असून तो पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या निडगुरसर इथला रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार मयत सोनाली हिचा पती सात वर्षांपासून तुरुंगात होता. दरम्यानच्या काळात तिचे सखाराम बरोबर प्रेम संबंध जुळले. ती काही काळ सखाराम बरोबर एकत्र राहत होती. मात्र तिचा नवरा तुरुंगातून सुटल्यानंतर ती पुन्हा तिच्या नवऱ्याकडे राहायला गेली. काही दिवसांनी पुन्हा तिने पुन्हा सखाराम कडे राहण्याची इच्छा व्यक्त केली. मी पतीला सोडून पुन्हा तुझ्याकडे राहायला येते, माझ्या पतीवर गुन्हाही दाखल करते. मात्र तू मला पैसे दे, असा तगादा तिने लावला होता. त्याचबरोबर पैसे दिले नाही तर सखाराम वरच गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील ती त्याला देत असल्याचं सखारामने सांगितलं आहे. सोनालीच्या याच धमक्यांना सखाराम कंटाळला होता.

बुधवारी या दोघांनी अहिल्या नगरच्या वांबोरी परिसरात असलेल्या पिलेश्वर देवस्थान मंदिरात फिरायला जायचं ठरवलं. त्यानुसार सोनाली पुण्यातून अहिल्यानगरला पोहोचली. बस स्थानकावर सखाराम तिला भेटला. त्यानंतर तो सोनालीला घेऊन वांबोरी परिसरात असलेल्या पंचमुखी महादेव मंदीराशेजारच्या डोंगराजवळ आला. त्या ठिकाणी पुन्हा सोनालीने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करायची धमकी दिली, त्यामुळे या दोघांमध्ये प्रचंड वाद झाले आणि या वादातच सोनालीला आपला जीव गमावावा लागला.

सोनाली आणि सखाराम यांच्यात वाद सुरू झाले. हे वाद विकोपाला गेल्यानंतर सखारामने सोनालीवर हल्ला केला. दगड आणि लाकडी दांडक्याने तिला जबर मारहाण केली. त्यानंतर त्याने थेट धारदार कोयत्याने तिच्या मानेवर वार केला. हा वार इतका जबर होता की त्यात सोनालीच शीर धडा वेगळं झालं. समोर सोनालीचा शीर आणि धड वेगळा झालेला मृतदेह पडलेला असतानाही निर्धास्तपणे सखाराम डोंगराळ भागातून तब्बल चार किलोमीटर लांब चालत गेला. जवळ असलेल्या राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत पोहोचल्यानंतर त्याने स्वतःच पोलिसांना फोन करून ‘मी माझी प्रेयसी सोनाली हिला ठार मारलंय’, असं म्हणून पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतलं. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सोनालीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

Share This News
error: Content is protected !!