पटना: बिहार मधून एक मोठे बातमी समोर येत असून महाराष्ट्राच्या अकोल्यातील असलेले आणि बिहारमध्ये दबंग अशी ओळख असणारे मराठमोळे अधिकारी शिवदीप लांडे यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.
या संदर्भात स्वतः शिवदीप लांडे यांनी आपल्या व्हेरिफाय फेसबुकवरून पोस्ट करत माहिती दिली आहे.
शिवदीप लांडे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात गेली 18 वर्षे शासकीय पदावर काम केल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढ्या वर्षांत मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा जास्त मानले आहे. माझ्या सेवेत काही चूक झाली असेल तर माफ करावे. मी यापुढे बिहारमध्येच राहणार आहे. बिहारच माझी कर्मभूमी असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिवदीप लांडे यांनी बिहार मधील तिरहुतपूर विभागात मुजफ्फरपुर, कोसी विभागाचे उपमहानिरीक्षक आणि बिहारमधील अररिया, पूर्णिया आणि मुंगेर जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाई केल्यामुळे शिवदीप लांडे लोकप्रिय झाले होते. शिवदीप लांडे हे महाराष्ट्रातील अकोल्या मधील असून शिवसेनेचे प्रवक्ते, पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, राज्याचे माजी जलसंपदा जलसंधारण संसदीय कार्य राज्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजय शिवतारे यांचे जावई आहेत