माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचं निधन

220 0

माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरुन वडिलांच्या निधनाची बातमी दिली.

माणिकराव गावित नंदुरबारमधून सलग नऊ वेळा खासदार राहिले. कार्यकर्त्यांमध्ये ते ‘दादासाहेब’ म्हणून लोकप्रिय होते. त्यांनी 1965 मध्ये ग्रामपंचायतीद्वारे राजकारणास सुरुवात केली होती. 1981 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री आदी पदांची जबाबदारी सांभाळली. ते लोकसभेचे हंगामी अध्यक्षही होते. गावित यांच्या पार्थिवावर नवापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!