बीड: मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतीचं नुकसान झालं आहे. याची पाहाणी करण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र त्याआधीच मराठवाड्यातील दिग्गज नेते आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात शिवसेनेचे काम करत असताना जयदत्त क्षीरसागर हे कुठल्याही कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचा फोटो लावत नाहीत. क्षीरसागर यांनी मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांची कधी भेट घेतली नाही. नुकताच एक उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. त्यात उद्धव ठाकरे यांचा फोटो नव्हता आणि त्यांच्या नावाचाही उल्लेख केला नाही. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांचा आजपासून शिवसेनेची काही संबंध राहणार नाही, अशी घोषणा जिल्हाध्यक्ष अनिल जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. त्यामुळे बीडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे