राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून 288 विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात वीस नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
आशाचाच वंचित बहुजन आघाडी कडून 43 उमेदवारांची आठवी यादी प्रसिद्ध करण्यात आली असून यात कोथरूड मतदारसंघातून योगेश राजापूरकर तर खडकवासला विधानसभा मतदारसंघातून संजय धीवर यांना उमेदवारी देण्यात आली.
तर कसब्यातून वंचित बहुजन आघाडीकडून प्रफुल्ल गुजर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रफुल्ल गुजर हे मागील सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असून सध्या त्यांच्या पुणे शहर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी आहे.