मुंबई : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा- 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी 15 एप्रिल ते 2 मे या कालावधीत आयोजित केली होती मात्र लोकसभा निवडणुकांमुळे ही शारीरिक चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यातआला आहे. MPSC ने या संदर्भात प्रसिद्धी पत्रक काढून याची अधिकृत माहिती दिली आहे.
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दि. 15 एप्रिल 2024 ते 2 मे 2024 या कालावधीत आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. pic.twitter.com/rF3yEWBc15
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) April 10, 2024
महाराष्ट्रात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आवश्यक असल्यामुळे 15 एप्रिल ते 2 मे या कालावधीत होणाऱ्या शारीरिक चाचणीसाठी पोलीस अधिकारी, तसेच इतर मनुष्यबळ पुरवणे शक्य होणार नसल्याचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी एमपीएससीला माहिती दिल्यामुळे 15 एप्रिल ते 2 मे या कालावधीतील नियोजित शारीरिक चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम एमपीएससीच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यातील हजारो उमेदवार पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेसाठी प्रयत्न करत असतात. 2021च्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या भरती परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तीन वर्षांनी जाहीर करण्यात आली आहे. तर आता 2022 च्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आल्यामुळे या परीक्षेच्या उमेदवारांनाही आता प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Politics : शरद पवारांचा वळसे पाटलांना मोठा धक्का ! ‘या’ मोठ्या नेत्याने दिला पवारांना पाठिंबा
Pulwama News : पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार
Haryana Accident : बस उलटून झालेल्या अपघातात 6 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू
Comments are closed.