पुणे : डीआरडीओचे (DRDO) संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर (Dr. Pradeep Kurulkar) या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. डीआरडीओ चे संचालक प्रदीप कुरूलकर याला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्याची पॉलिग्राफ टेस्ट (Polygraph test) करण्यात येणार आहे. त्यांना हनीट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकून पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली होती. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने(ATS) कुरुलकर यांना गोपनीयता कायद्याअंतर्गत ही कारवाई केली होती.
