बांधकाम व्यावसायिक युवराज ढमालेंनी केलं फसवणुकीच्या आरोपांचं खंडण; कायदेशीर कारवाई करण्याचा दिला इशारा

340 0

पुणे: कोंढवा येथील राजगृही बिझनेस हब कमर्शियल प्रिमायसेस सहकारी संस्थेची इमारत युवराज ढमाले, विकी संघवी व इतर विकासकांनी बांधली आहे. येथील रहिवाशांना फ्लॅट दिला मात्र पार्किंग चा रॅम्प नसल्याने त्यांना पार्किंग वापरता येत नाही.

तसेच पार्किंगच्या जागेत बेकायदेशिरपणे जिम व हॉटेलचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे महापालिकेने या बेकायदेशीर कामावर व महापालिकेची फसवणूक करणाऱ्या या विकासकांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुषार पाटील, माजी नगरसेवक शंकर पवार, राहुल भंडारे, पिंटू धाडवे यांनी केली आहे.

दरम्यान सोसायटीतील रहिवाशांनी आपली कुठल्याही प्रकारचे फसवणूक झाली नसून यामध्ये सोसायटीचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये असं लिखित पत्राद्वारे सांगितलं आहे.

दरम्यान आता स्वतः युवराज ढमाले यांनी याबाबत खुलासा केला असून हा प्रकल्प पूर्ण करत असताना कायदेशीर रित्या सर्व परवानगी घेऊन व पुणे महानगरपालिकेकडून प्लॅन मंजूर करूनच केला असल्याचं बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांनी म्हटलं आहे.

Share This News
error: Content is protected !!