BREAKING NEWS | यूपीएससी कडून पूजा खेडकर विरोधात FIR दाखल

382 0

 

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) पूजा खेडकर विरोधात खटला दाखल केला आहे. त्याचबरोबर आयोगाची फसवणूक केल्या प्रकरण कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे. याबद्दलची माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे.

काय म्हणाले यूपीएससी ?

यूपीएससी नागरी सेवा परीक्षा-2022 च्या शिफारस केलेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवार कु. पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या गैरवर्तनाचा तपशीलवार आणि सखोल तपास केला आहे. या तपासणीतून असे उघड झाले आहे, की पूजा खेडकर हिने परीक्षा नियमांनुसार परवानगी असलेल्या मर्यादेच्या पलीकडे तिचे नाव, तिच्या वडिलांचे आणि आईचे नाव, तिचे फोटो/स्वाक्षरी, तिचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून तिची ओळख खोटी करून फसवणूक केली आहे. या विरोधात आयोगाने एफ आय आर दाखल करून कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचबरोबर उमेदवारी रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस देखील जारी केली आहे.

कारवाई झाल्यास पुढे काय ?

केंद्रीय लोकसेवा आयोगाने दाखल केलेल्या खटल्यानंतर पूजा खेडकर यांच्या विरोधातील सर्व पुरावे मिळाल्यास त्या या प्रकरणात दोषी आढळतील. ज्यामुळे त्यांचे आयएएस पद जाऊ शकते. पूजा खेडकर यांचे आयएएस पद आयोगाकडून रद्द केले जाईल त्याचबरोबर त्यांना भविष्यात पुन्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देता येणार नाही. तसेच दंडात्मक आणि फौजदारी कारवाई होऊ शकते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!