वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरसह तिच्या आई-वडिलांचेही नवनवीन प्रताप समोर येत आहेत. मुळशीतील शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्या प्रकरणी पूजा खेडकर ची आई मनोरामा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी कारवाई पासून वाचण्यासाठी मनोरमा या महाडच्या हॉटेलमध्ये लपून बसल्या होत्या. त्यावेळी त्यांनी इंदुबाई ढाकणे या नावाने रूम बुक केली होती तसेच आधार कार्ड देखील दाखवले होते. याबाबतची सविस्तर माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.
मनोरमा खेडकर यांनी पोलिसांपासून वाचण्यासाठी पुण्याहून महाडला जाण्याचे ठरवले. त्यावेळी त्यांनी कॅप बुक केली. या कॅप चालकाचे नाव दादासाहेब ढाकणे असे आहे. मनोरमा यांनी कॅप चालकाच्या आईचे म्हणजेच इंदुबाई ढाकणे यांचे आधार कार्ड मिळवले. हेच आधार कार्ड दाखवून महाडमध्ये रूम बुक केली. इंदुबाई या नावाने त्या दोन दिवस हॉटेलमध्ये राहिल्या. नाव बदलून राहत असल्यामुळे पोलिसांना मनोरमा यांचा शोध लागत नव्हता. मात्र 17 जुलैला रात्री अकरा वाजता मनोरमा यांनी कॉल करण्यासाठी फोन चालू केला. पोलिसांनी त्यांचा मोबाईल सर्विलन्सला टाकल्यामुळे पोलिसांना तात्काळ त्यांचे लोकेशन मिळाले. तात्काळ घटनास्थळी जाऊन पोलिसांनी मनोरमा यांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात ही माहिती स्पष्ट झाली आहे. मात्र इंदुबाई ढाकणे यांचे आधार कार्ड दाखवून रूम बुक केल्यामुळे इंदुबाईंचे कुटुंब चौकशीच्या फेरीत अडकण्याची शक्यता आहे. कॅब चालक ढाकणे याने आपल्या आईचे आधार कार्ड मनोरमा यांना का दिले ? त्या बदलात मनोरमा यांनी त्याला पैसे दिले होते का ? मनोरमा आणि ढाकणे यांची परस्पराशी आधीपासून ओळख होती का ? या सगळ्याच प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी ढाकणे कुटुंबीयांची पोलीस चौकशी होण्याची आणि मनोरमा यांच्या गैरप्रकारामुळे ढाकणे कुटुंबीय अडचणीत येण्याची शक्यता आहे.