बदलापूर मधील साडेतीन आणि चार वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील स्वच्छता कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदेने अत्याचार केले होते. या प्रकरणी अक्षय पोलिसांच्या कोठडीत होता. या प्रकरणातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. आज म्हणजेच 23 सप्टेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास अक्षय शिंदेने पोलिसांकडे असलेली सर्व्हिस रिवॉल्वर खेचून पोलिसांवरच गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी अक्षयवर गोळी झाडून त्याचा एन्काऊंटर केला असल्याची माहिती समोर येत आहे.
सुरुवातीला आरोपी अक्षय शिंदे यांनी पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर आली होती मात्र अक्षय पोलिसांवर केलेल्या गोळीबारामधून स्वतःचा बचाव करताना पोलिसांनीच त्याच्यावर गोळी झाडली असून त्याचा एन्काऊंटर केला. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.