मोठी बातमी! कसबा विधानसभेची पोटनिवडणूक संभाजी ब्रिगेड लढवणार; लवकरच उमेदवारही करणार जाहीर

603 0

भाजपा आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर असून 27 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 2 मार्च रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

दरम्यान या निवडणुकीत उमेदवार कोण द्यायचा यावरून भाजपासह काँग्रेस, राष्ट्रवादीसमोर प्रश्न असतानाच आता संभाजी ब्रिगेडनं ही निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

संभाजी ब्रिगेडच्या पुणे शहराची संपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज पार पडलेल्या बैठकीत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच आम्ही उमेदवार जाहीर करू अशी भूमिका संभाजी ब्रिगेडनं घेतली आहे.

Share This News
error: Content is protected !!