पीएमपीएमएल प्रशासन आता नागरिकांसाठी ई-चार्जिंग स्टेशन उभारत आहे. अदानी टोटल गॅस लिमिटेड च्या मदतीनं पुण्यात सात ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. अदानी समूहाच्या पथकाने या जागांची पाहणी केली आहे.पीएमपीच्या जागेवरच हे चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. यासाठी अदानी समूह खर्च करणार आहे.
जागेच्या बदल्यात पीएमपीला 32 % रक्कम दिली जाणार आहे.
पीएमपीच्या स्वतःच्या मालकीच्या अनेक ठिकाणी जागा आहेत. त्यापैकी काही निवडक जागांवर ई वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.
हे चार्जिंग स्टेशन सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ई वाहन चालकांची मोठी सोय होणार आहे.
या भागात होणार चार्जिंग स्टेशन
हिंजवडी, कात्रज, बाणेर- सुस रोड, भोसरी,
पुलगेट, डेक्कन जिमखाना, हिंजवडी फेज 2